Anju Nasrullah News | अंजू पाकिस्तानात नसरुल्ला सोबत दिसली बुरख्यात, व्हिडिओ व्हायरल

Anju Nasrullah News | अंजू पाकिस्तानात नसरुल्ला सोबत दिसली बुरख्यात, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन : भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारुन नसरुल्लाह याच्याशी निकाह केला. अंजूचे नवीन नाव फातिमा असे आहे. ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती नसरुल्लाह आणि त्याच्या मित्रांसोबत रात्रीचे जेवण जेवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत अंजू बुरख्यात दिसत आहे. पाकिस्तानातील एका पत्रकाराने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पण त्याची पुष्टी झालेली नाही. (Anju Nasrullah News)

याआधी अंजू आणि नसरुल्ला यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचा असल्याचे समजते. हा व्हिडिओ पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाच्या दीर बाला जिल्ह्यात शूट करण्यात आला होता. पाकिस्तानातील काही मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अंजू आणि नसरुल्लाह यांना निकाह केला आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. पण अंजूने 'अमर उजाला'शी बोलताना सांगितले की तिने निकाह केलेला नाही. धर्मांतर आणि नाव बदलून फातिमा ठेवल्याचे वृत्त ही केवळ अफवा आहे. अंजूने म्हटले आहे की मी परत येण्याची तयारी करत आहे.

नसरुल्ला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका गावात राहतो. तर भारतातील ३४ वर्षीय अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला. लग्नानंतर अंजू पती अरविंद आणि मुलांसोबत राजस्थानमधील अलवर येथे राहत होती.

अंजूचा पहिला पती आला समोर, म्हणाला…

अंजू पाकिस्तानात गेल्याने तिचा पहिला पती अरविंद याने संताप व्यक्त केला आहे. ती इतकं कठोर पाऊल उचलेल असं मला वाटलं नव्हतं. अंजू भारतात परतल्यावर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याचे अरविंदचे म्हटले आहे. ती अजूनही कायदेशीररित्या माझी पत्नी आहे. तिने पाकिस्तानात जाण्यासाठी कोणती कागदपत्रे दिली होती याचा शोध घेण्यासाठी सरकारने तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाच्या कागदपत्रांचीही छाननी करावी, अशी मागणीही त्याने केली आहे. (Anju Nasrullah News)

अंजूने पाकिस्तानमधील मीडियाला सांगितले आहे की, तिच्या आणि अरविंदच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी तिने दिल्लीत घटस्फोटाची कागदपत्रे सादर केली होती. याबाबत अरविंद सांगतो की, अद्याप त्याला घटस्फोटाबाबत न्यायालयाकडून कोणतीही नोटीस अथवा समन्स मिळालेले नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news