The Night Manager 2 : अनिल कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

The Night Manager 2
The Night Manager 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : सगळयांना उत्सुकता असलेला "द नाईट मॅनेजर 2 "चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर आता पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. शस्त्र विक्रेता शेली रुंगटा दुसऱ्या सीझनमध्ये नक्की काय भूमिका घेणार? काय घडणार या सगळ्यांची उत्तरे ३० जून रोजी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधून अनिल कपूरच्या हँडसम लूकच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता हा सीजन लवकर यावा, यासाठी सगळेच ३० जूनची वाट बघणार आहेत. दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित होताच शेली रुंगटा पहिल्या सीझनपेक्षा अधिक निर्दयी, क्रूर आणि थोडा अजून उत्साहवर्धक दिसणार आहे.

अनिल कपूरने त्याच्या सोशल मीडियावर कॅप्शनसह ट्रेलर पोस्ट केला आहे. "शेली की लंका जलाने के लिए, शान है तैयार" अशी कॅपशन लिहीत मोस्ट अवेटेड सीझन फिनाले येतोय, अशी खास पोस्ट त्याने लिहिली आहे.

दुसरा सीजन 30 जून रोजी रिलीज होणार आहे. अनिल कपूरला निर्दयी शस्त्र विक्रेता म्हणून पाहण्याची उत्सुकता या सीजन मध्ये पूर्वीपेक्षा जास्त असणार आहे. पहिल्या सीझनमध्ये अनिल कपूरने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते आणि आता पुन्हा तो प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी तयार झाला आहे.

द नाईट मॅनेजरमध्ये अनिल आणि आदित्य रॉय कपूर ही सुपरहिट जोडी दिसणार आहे. अनिलकडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर, त्यानंतर सुभेदार आणि अँड्रॉईड कुंजप्पन Ver 5.25 चे हिंदी भाषेतील असे अनेक दर्जेदार चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news