Kiran Kumar Reddy Join BJP: दक्षिण भारतात भाजपच्या मोठ्या हालचाली; आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले कमळ

Kiran Kumar Reddy Join BJP: दक्षिण भारतात भाजपच्या मोठ्या हालचाली; आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले कमळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दक्षिण भारतातील राज्यांमध्ये काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांच्या भाजप प्रवेशानंतर आता, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते किरण कुमार रेड्डी (Kiran Kumar Reddy Join BJP) यांनी भाजपमध्ये प्रवेश करत, हातात कमळ घेतले आहे. यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा दक्षिणेत धक्का बसला आहे.

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी शुक्रवारी(दि.०७) भारतीय जनता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गेल्याच महिन्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एका ओळीचे पत्र पाठवित काँग्रेसला रामराम (Kiran Kumar Reddy Join BJP) केला होता.

रेड्डी यांच्या प्रवेशामुळे भाजपला दिलासा; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत किरण कुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये आज (दि.०७) प्रवेश केला. यावेळी त्याच्या भाजप प्रवेशावर बोलताना मंत्री जोशी म्हणाले, किरणकुमार रेड्डी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य काँग्रेसमध्ये होते. काही काळापूर्वी जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, त्याच्यावर पंतप्रधान मोदींचा प्रभाव आहे. आज ते मोठी झेप घेऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील आमची लढाई ते बळकट करतील, कारण आमदार आणि मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आंध्र प्रदेशात भाजपला मोठा दिलासा (Kiran Kumar Reddy Join BJP) मिळेल, असेही ते म्हणाले.

किरण कुमार रेड्डी यांची काँग्रेसमधील कारकीर्द

आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करीत किरणकुमार रेड्डी यांनी 2014 साली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रातील तत्कालीन संपुआ सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करुन तेलंगण हे वेगळे राज्य बनविले होते. 2014 मध्येच रेड्डी यांनी काॅंग्रेसमधून बाहेर पडत जय सामायिक आंध्र नावाच्या प्रादेशिक पक्षाची निर्मिती केली होती. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काही मतदारसंघात उमेदवारही उभे केले होते. मात्र रेड्डी यांना फारसे यश लाभले नाही. त्यानंतर काही काळ राजकारणातून दूर झालेल्या रेड्डी यांनी 2018 मध्ये पुन्हा काॅंग्रेस प्रवेश केला होता.

यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्र्यांच्या मुलाचा देखील भाजप प्रवेश

ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल  अँटनी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बीबीसीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यानंतर काॅंग्रेसकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. मात्र अनिल अँटनी यांनी त्यावरून काॅंग्रेला सुनावले होते तर दुसरीकडे बीबीसीवर आगपाखड केली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता. अनिल अँटनी यांचा भाजप प्रवेश काॅंग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news