सूर्यदेव तापले! तापमान 3 ते 4 अंशांनी वाढल्याने राज्यात प्रचंड उकाडा

सूर्यदेव तापले! तापमान 3 ते 4 अंशांनी वाढल्याने राज्यात प्रचंड उकाडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी राज्याचा पारा तीन ते पाच अंशांनी वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. सरासरी कमाल तापमान 38 ते 40 अंशावर गेले. अकोला, चंद्रपूर, सोलापूर आणि वर्धा या चार शहरांचे कमाल तापमान चाळिशीपार गेले होते. दरम्यान आगामी दोन दिवसात राज्यात गारपिटीची शक्यता असल्याने वाढलेल्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

आगामी चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला असला तरी दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी काही भागात पाऊस असे विचित्र वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी बहुतांश शहरांचे तापमान 38 ते 40 अंशावर गेले. कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली.

गुरुवारचे प्रमुख शहरातील तापमान
अकोला 40.4, सोलापूर 40.3, चंद्रपूर 40.2, वर्धा 40, कोल्हापूर 36.7, पुणे 36.8, नगर 36, सातारा 36.2, महाबळेश्वर 31.5, छत्रपती संभाजीनगर 37.2, परभणी 39.9, नांदेड 38, बीड 38.4, मुंबई 31.2.

चक्रकार वार्‍यांमुळे बंगाल व अरबी समुद्रातून आलेल्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्राच्या भूभागावर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.

                 -माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news