‘ट्विटर व्हेरिफाईड’च्या निर्णयाने सोशल मीडियावर खळबळ, सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स केले अनफॉलो

‘ट्विटर व्हेरिफाईड’च्या निर्णयाने सोशल मीडियावर खळबळ, सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स केले अनफॉलो

पुढारी ऑनलाईन: एलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार हाती घेतल्यापासून ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहे. एलॉन मस्क ट्विटरसंदर्भातील बदलांमुळे नेहमीच चर्चेत अतात. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड काढून त्याऐवजी Doge Image होमपेजवर दिसत होती. आता ट्विटरनं पुन्हा एकदा आपला आयकॉनिक लोगो ठेवला आहे. परंतु, हा लोगो ठेवत असताना आणखी एक बदल केला आहे. 'ट्विटर व्हेरीफाईड'कडून ट्विटरचे सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत. यापुढे ट्विटर व्हेरिफाईड कोणालाही फॉलो करणार नाही.

ट्विटर यापूर्वी सुमारे 420,000 व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो करत होते. तसेच कंपनीने ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर एक एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या वापरकर्त्यांसाठी चेकमार्क (ब्लू टिक) काढून टाकण्याचा इशारा देखील दिला होता. सीईओ एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ज्या युजर्सकडे ट्विटर ब्लूची मेंबरशिप नाही, त्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. यातच आता ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत.

यापूर्वी ट्विटरकडून फक्त सेलिब्रिटी, सरकारी संस्था किंवा प्रसिद्धीझोतात असलेल्या व्यक्तींना व्हेरिफाईड टॅग असलेलं ब्लू टिक दिलं जायचं. आता सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक विकत घेऊ शकणार आहे. याबरोबरच ब्लू टिक असलेल्या युजर्सना काही अतिरिक्त सुविधा देखील मिळत आहेत. उदाहरणार्थ ट्वीटची कॅरेक्टर लिमिट अधिक असेल. तसेच ट्वीटमध्ये एडिट किंवा अनडू करण्याचा पर्यायही उपलब्ध असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news