Mumbai Police | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडवणार! मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर

Mumbai Police | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडवणार! मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर

पुढारी ऑनलाईन : एका अज्ञात व्यक्तीने फोन करून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येऊन मोठा घातपात घडवणार असल्याची असल्याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. या कॉलनंतर मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिस स्थानकाशी संपर्क साधून यंत्रणेला सतर्क केले, असे मुंबई पोलिसाने सांगितले.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमान खानच्या घरातून कॅब बुक

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक कॅब बुक करण्यात आली होती. ही कॅब बुक होताच पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला शुक्रवारी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित त्यागी असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पोलिसांनी म्हटले आहे की, संशयित आरोपीने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक केली होती.

"जेव्हा कॅब ड्रायव्हर सलमान खानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचला आणि तिथल्या वॉचमनला कॅब बुकिंगबद्दल विचारले, तेव्हा आधी आश्चर्यचकित झालेल्या वॉचमनने लगेच जवळच्या वांद्रे पोलिस स्थानकाला याची माहिती दिली," असे पोलिसांनी सांगितले. या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी कॅब चालकाची चौकशी करून कॅब ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेतली. पोलिसांच्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, संशयित आरोपींनी बिश्नोईच्या नावाने कॅब बुक केली होती.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घराबाहेर गोळीबाराची घटना १४ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने संशयित आरोपी विक्की गुप्ता याचा भाऊ सोनू गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सोनूही या गोळीबार प्रकरणात सहभागी असल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे. (Firing at Salman Khan's house)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news