रत्नागिरीतील आणखी एक आमदार नॉटरिचेबल

रत्नागिरीतील आणखी एक आमदार नॉटरिचेबल

खेड; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातील नऊ आमदार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रत्नागिरीतील आणखी एक आमदार नॉटरिचेबल आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र व खेड- दापोली- मंडणगडचे आमदार योगेश कदम हे नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. महाविकासआघाडी सोबतची युती आपल्या मतदारसंघात आपल्याच मुळावर येईल, अशी भीती या आमदारांना असल्याने हे आमदार शिंदेंसोबत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंदेंसोबत पालघर मधील एक, ठाण्यातील पाच, रायगडमधील तीन आमदारांचा समावेश आहे. यामध्ये रायगडचे आमदार भरत गोगावले व महेंद्र दळवी हे शिंदे यांच्या सोबत गेले असले तरी रत्नागिरी मधील सर्व आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसत होते. मात्र मंगळवारी सायंकाळी शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर खेड- दापोली- मंडणगडचे आमदार योगेश कदम हे नॉटरिचेबल झाले आहेत. रामदास कदम यांना गेल्या काही वर्षांपासून पक्षाने बाजूला केले आहे. पक्षातील कार्यप्रणाली बाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. तसेच रामदास कदम यांच्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा शिंदे यांनी कदम यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबध असुन त्यांना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली होती. आमदार योगेश कदम नॉट रिचेबल असल्याने आगामी कालावधीत शिंदेंच्या गटाचे समर्थन करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news