Amrita Rao wedding : अमृता रावने ‘असे’ फोटो शेअर करत, दिला चाहत्यांना धक्का

Amrita Rao wedding : अमृता रावने ‘असे’ फोटो शेअर करत, दिला चाहत्यांना धक्का
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अमृता रावने तिच्या ऑफीशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत, चाहत्यांना जोर का धक्का दिला. शेअर केलेल्या फोटोत बॉलीवूड अभिनेत्री अमृता आणि आरजे अनमोल नववरवधूच्या पेहरावात दिसत आहेत. हे पारंपारिक पेहरावातील फोटो पाहताच अमृता रावच्या लग्नाचे रहस्य समोर आले. यावर तिचे चाहते, आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लग्नसराई सुरू आहे. कतरिना कैफ-विकी कौशल, राजकुमार राव-पत्रलेखा आणि फरहान अख्तर-शिबानी दांडेकर या बॉलीवूड कलाकारांनी सातजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. यामध्ये आणखी एका स्टार बॉलीवूड अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल या जोडीनेही भर घातली आहे. अमृताच्या लग्नाची छायाचित्रांनी बॉलीवूड आणि चाहत्यांना हैराण केले आहे. हा फोटो लेटेस्ट नसला तरी या फोटोने तिच्या लग्नाबाबत एक मजेदार गुपित उघड केले आहे.

अमृता रावने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यात अमृता मराठी नववधूच्या, तर आरजे अनमोल हे पारंपारिक वराच्या पेहरावात दिसत आहेत. फोटो शेअर करत अमृताने लिहिले आहे की, "जर हे आमच्या SECRET VIVAH चे पोस्टर असते, तर… हे एकच असते … BIO मधील नवीनतम लिंकमधील फोटो ❤️ हा माझ्या बहिणीने – अंकिता हिच्या संकल्पनेतून एका समारंभानंतर क्लिक केला होता".

अभिनेत्री अमृता रावने अलीकडेच एका शोदरम्यान अमृताने खुलासा केला होता की, तिने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत गुप्त लग्न केले होते. जेव्हा अमृता तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आरजे अनमोलच्या रेडिओ शोमध्ये गेली तेव्हा दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. या शोमध्येच त्यांची ओळख झाली, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2016 मध्ये अमृता आणि अनमोलचे लग्न झाले. 2020 मध्ये त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव 'वीर' असे आहे. या दोघांनी फक्त कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पुण्यातील इस्कॉन मंदिरात लग्न केले. लग्नाच्या वेळीचाच एक फोटो अमृताने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Anmol ?? (@rjanmol27)

पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news