पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी "उत्तरार्धातील बोलके चित्र" असं लिहित एक फोटो ट्विट केला आहे. त्याचे हे सूचक ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. (Amol Mitkari Photo Tweet)
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी मंत्री व आमदारांवरील टीकेची एकही संधी सोडत नाहीत. सत्तांतरानंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अधिवेशन सुरु असतानाच शिंदे-फडणवीस यांच्या भव्य कटआउटचा फोटो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'उत्तरार्धातील बोलके चित्र' असं लिहित शेअर केला आहे.
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य कट्आटस उभारण्यात आल्याचा फोटो मिटकरी यांनी शेअर केला आहे. यामध्ये फडणवीस यांच्या कटआउटची उंची ही शिंदे यांच्यापेक्षा जास्त आहे. हा फोटो शेअर करत मिटकरी यांनी लिहलं आहे की, उत्तरार्धातील बोलके चित्र…. मिटकरी यांनी या माध्यामातून राज्यातील राजकीय 'वजना'विषयी आपलं मत व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अमोल मिटकरी यांनी यापूर्वी राज्य विधिमंडळ परिसरातील आतापर्यंत ४ व्हिडीओ शेअर करत तेथील व्यवस्थापनावर बोलले होते.
हेही वाचा