Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्तांतर; काही दिवसांनी ते खाकी पॅंट, काळी टोपी घालून सभागृहात जातील- संजय राऊत

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्तांतर; काही दिवसांनी ते खाकी पॅंट, काळी टोपी घालून सभागृहात जातील- संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यालय सील करण्यात आले. या बाबतीत माध्यमांशी बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "मुंबई मनपातील पक्ष कार्यायल आमचंच आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील का केली? आणि नोटीस न देताच का सील केली? ही लोकशाही नव्हे ठोकशाही आहे. ते पुढे असे म्हणाले,"शिंदे गट घुसखोराचं आहे. गद्दार कुठेही घुसतात. या गटाला अस्तित्व नाही. गद्दारांना जगभरात पद्धत नसते. ते कुठेही घुसतात. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो. असं बोलत त्यांनी शिंदे गटावर निशाणा त्यांनी साधला.

एक दिवस मुख्यंत्र्यांच्या कार्यालयात भाजप घुसेल

मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून बुधवारी झालेल्या ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर गुरुवारी शिवसेनेसह महापालिका मुख्यालयातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यालय सील करण्यात आले. यावर बोलताना संजय राऊत  म्हणाले, "मुंबई मनपातल पक्ष कार्यायल आमचंच आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील का केली? आणि नोटीस न देताच का सील केली? ही लोकशाही नव्हे ठोकशाही आहे. ठोकशाहीत आमच्याशी स्पर्धा करु नका.

पुढे बोलताना ते म्हणाले," शिवसेना भवन हे बाळासाहेबांच, शिवसैनिकांच आहे आणि त्यांचाच राहील. एक दिवस मुख्यंत्र्यांच्या कार्यालयात भाजप घुसेल असेही ते म्हणाले.

एवढ्या लवकर रक्तांतर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात बोलत असताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले,"रेशीम बागला जाण्यात काहीच गैर नाही. पण एवढ्या लवकर रक्तांतर होईल असं वाटलं नव्हतं. काही दिवसांनी ते खाकी पॅंट व काळी टोपी घालून सभागृहात जातील. असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news