Amitabh Bachchan’s diet : वय वर्ष ८० तरीही तरुणांना लाजवेल असा उत्‍साह, जाणून घ्या महानायकअमिताभ बच्चन यांच्‍या आहारविषयी

Amitabh Bachchan's 80th Birthday
Amitabh Bachchan's 80th Birthday

पुढारी ऑनलाईन डेस्क : महानायक अमिताभ बच्चन आज ( दि ११ ) वयाची ८० पूर्ण करुन ८१ व्‍या वर्षांत पदार्पण करत आहेत. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ ते बाॅलीवूडमध्‍ये सक्रीय आहेत. या वयातही तरुणांना लाजवेल असा त्‍यांचा मनाेरंजन क्षेत्रात वावर आहे.  अमिताभ बच्चन हे त्‍यांच्‍या आहाराबराेबरच आणि फिटनेसवर विशेष लक्ष देतात. आज त्‍यांचा वाढदिवस. जाणून घेवूया यांच्‍या आहाराविषयी…(Amitabh Bachchan's diet )

 अमिताभ आहेत शाकाहारी (Amitabh Bachchan's 80th Birthday

अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक आजारांशी झुंज दिली. त्यांनी टीबी आणि यकृताच्या आजारावर यशस्वी मातही केली. त्यांनी दोन वर्षभरापूर्वी कोरोनावरही मात केली होती. आपल्या आरोग्याबाबत अमिताभ नेहमी सतर्क असतात. दारू आणि धुम्रपान अशा व्‍यसनांपासून ते लांबच राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी मांसाहारही सोडला आहे. ते शाकाहारी आहार घेतात. नियमित व्यायामही करतात. (Amitabh Bachchan's diet )

आवळा आणि तुळशीच्या रसाचा आहारात समावेश

बिग बी सकाळी उठल्यानंतर योगासने आणि प्राणायाम करतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, "त्यांच्या दिवसाची सुरूवात व्यायामाने होते. व्यायाम केल्यानंतर ते खजूर, सफरचंद आणि केळी खातात. त्यांच्या नाष्ट्यामध्ये अंडाभुर्जी, दूध आणि बदाम यांचा समावेश असतो. आवळा आणि तुळशीचा रसही पितात. (Amitabh Bachchan's 80th Birthday)

Amitabh Bachchan's diet : साधा आणि हलका आहार

अमिताभ यांचे  जेवण साधे आणि पचण्यासाठी हलके असते. यामध्‍ये दाळ, इतर भाज्या आणि चपाती यांचा समावेश असतो. अमिताभ बच्चन सातत्याने एकाजागी बसत नाहीत. ते प्रत्येक २० मिनिटांनी थोडे फिरून येतात. बच्चन हे आपल्या आरोग्याबाबत नेहमी काळजी घेतात. त्यामुळेच ८१ व्‍या वर्षीही त्‍याचा उत्‍साह तरुणांना लाजवेल असाच असताे. (Amitabh Bachchan's 80th Birthday)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news