बिग बींच्या घरातील मंदिर इतकं सुंदर! तुळशीला जल अर्पण करताना दिसले Amitabh

बिग बींच्या घरातील मंदिर इतकं सुंदर! तुळशीला जल अर्पण करताना दिसले Amitabh

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन यांनी 'जलसा' या निवासस्थानातील मंदिराची काही सुंदर फोटोंची झलक दाखवली आहे. (Amitabh) हे फोटो त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोंना सुंदर कॅप्शनदेखील लिहिलीय – आस्था. (Amitabh)

संबंधित बातम्या –

अमिताभ बच्चन यांनी एकूण चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ते अभिनेता शिवलिंगावर दूध अर्पण करताना दिसत आहे. शिवलिंगासोबतच राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्तीही दिसतात. दुसऱ्या फोटोमध्ये ते तुळशीला जल अर्पण करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन हे दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये अनेक कलाकारांची फौज पाहायला मिळेल. प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन असे दिग्गजांच्या यामध्ये भूमिका असतील. . याशिवाय अमिताभ बच्चन हे रजनीकांतसोबत 'थलैवर 170'मध्येही दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news