शेतकऱ्यांना दसरा भेट : शेतीमाल निर्यातीसाठी सरकारची स्वतंत्र कंपनी; ५० टक्के नफा बळीराजाला मिळणार

Amit Shah News
Amit Shah News

पुढारी ऑनलाईन: महा नवमीच्या शुभ मुर्हूतावर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि.२३) नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडची स्थापणा करण्यात आली. याद्वारे भारतातील सहकारी संस्थांना निर्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे भारतातील सहकार क्षेत्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले गेल्याने या क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील सहकारी निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. या संदर्भातील वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. (Amit Shah News)

याप्रसंगी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या औपचारिक शुभारंभ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लोगो, वेबसाइट आणि ब्रोशरचे अनावरण देखील शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते. (Amit Shah News)

आपल्या देशात आता बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अनेक पुढाकार घेतले आहेत. तसेच मला हे सांगताना आनंद होत आहे की, 12 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची NCEL मध्ये नोंदणी झाली आहे. तसेच सहकारी निर्यात संस्था NCEL ला आतापर्यंत ७ हजार कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या आहेत. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या स्थापनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळणार आहे, असे देखील सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news