Ameesha Patel : अमीषा पटेल पाकिस्तानच्या अभिनेत्यासोबत डेटवर? (Video)

Ameesha Patel : अमीषा पटेल पाकिस्तानच्या अभिनेत्यासोबत डेटवर? (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वादग्रस्त प्रकरणात चर्चेत राहणारी बॉलिवूडची अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती सध्या एका पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. अमीषा पटेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बास दिसत आहे. अमीषा पटेल (Ameesha Patel) बहरीनला असतानाचा हा व्हिडिओ आहे. दोघेही दिल नें दर्द सा या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. हे गाणे अमीषाचा २००२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट क्रांतीमधील आहे. तिने या व्हिडिओ कॅप्शन लिहिली आहे-मागच्या आठवड्यामध्ये बहरीन येथे माझा सुपरस्टार मित्र इम्रान अब्बाससोबत. या दोघांची बॉन्डिंग पाहून नेटकऱ्यांनी प्रेम व्यक्त केलंय. तसेच सोशल मीडिया युजर्सनी भरभरून कमेंट्स द्यायला सुरुवात केलीय. अमीषा आणि इम्रानची केमिस्ट्री पाहून अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. (Ameesha Patel)

या चित्रपटातून दिसणार अमीषा

'कहो ना प्‍यार है' (Kaho Na Pyar Hai) या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अमीषाने खूप कमी वेळेत इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. सनी देओलसोबत तिने 'गदर' हा चित्रपट केला आणि ती रातोंरात स्टार झाली. लवकरच गदर २ येणार आहे. फॅन्सना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिलीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news