पुढारी ऑनलाईन डेस्क: कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे आणि यश प्राप्त करणे ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आमिषा पटेल. आज ती आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
अभिनेत्री अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. हृतिक रोशननेही या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अमिषा आणि हृतिक रातोरात स्टार झाले होते.या सिनेमानंतर 'गदर एक प्रेमकथा' सनी देओलसह आमिषा पटेलचा हा सिनेमाही सुपरहिट ठरला.आमिषाकडे पैसा प्रसिद्धी सगळे काही होते. मात्र मिळालेले यश आमिषा पटेल टिकवता आले नाही. या मागचे कारण शोधायला गेलं तर चित्रपटांपेक्षा जास्त तिचं नाव वादांमध्ये राहिले आहे. कदाचित या वादामुळेच अमिषाचे करिअर संपुष्टात आले असे म्हणायाला हरकत नाही.
अमीषाच्या चित्रपटांबद्दल बोलायाचे झाले तर, २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'हमराज' चित्रपटानंतर अमीषाच्या करिअरला ब्रेक लागला. पण त्यानंतर तिचे सगळेच सिनेमे फ्लॉप ठरत गेले. करिअरला सुरुवात केली त्यावेळी अमिषाने 'सिलेक्टीव्ह' होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत.
मात्र बहुतांश तिचे चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली. २००६ मध्ये अब्बास मस्तानच्या 'हमराज'ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. २०१८ साली 'भैयाजी सुपरहिट' हा तिचा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमाही दणकून आपटला. यानंतर अमीषाने काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले पण त्यातही तिला यश मिळालं नाही. आता अमीषा चित्रपटांमध्ये अमिषा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
खरंतर बॉलीवूडमध्ये सर्वात अधिक शिक्षण घेणारी अभिनेत्री म्हणून अमिषाची ओळख आहे. अमीषाने इकोनॉमिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमीषा कोणत्याही सिनेमात झळकलेली नाही. कामच मिळत नसल्याने ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे.
अमीषाचे तिच्या कुटुंबासोबत वाद झाले होते. तिने स्वतःच्या वडिलांवर गंभीर आरोप केले. अमीषाने तिच्या वडिलांवर १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. माझे वडील माझ्या पैशांचा गैरवापर करतात; असा आरोप तिने केला. त्यासाठी अमीषाने वडिलांना कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने सांगितले, 'तिचे वडील तिच्या कमाईचा दुरुपयोग करीत आहेत.' या बातमीचा थेट परिणाम अमिषा पटेल यांच्या कारकीर्दीवर होऊ लागला. त्याचवेळी अमीषा पटेलचे एका प्रसिद्ध दिग्दर्शकासह अफेअर सुरु झाले होते. आमिषाचे प्रेमात पडणे तिच्या पालकांना अजिबात मान्य नव्हते. अमीषाच्या आई-वडिलांनी तिला घरातून हाकलून दिले होते.
आमिषा इथेच शांत बसली नाही तिने थेट प्रेस कॉन्फ्रेंस बोलावली आणि त्यात तिच्या आईवरच तिने खूप गंभीर आरोप केले. आईने चपलांनी मारत तिला घराबाहेर काढल्याचे तिने मीडियाला सांगितले. तिच्या या मुलाखतीचा थेट परिणाम करिअर होत गेला.
दरम्यान, निर्माता निर्देशक विक्रम भट्टसोबत तिचे नाव जोडल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र तिचे ही नाते फार काळ टिकले नाही. कौंटुंबिक वाद आणि रिलेशनशिपमधील दुःख सावरण्यासाठी तिने मद्यप्राशनास सुरूवात केली असल्याची बातम्या झळकू लागल्या. या सर्वांचा परिणाम तिच्या करिअरवर होत गेला. अमिषाच्या २१ वर्षाच्या बॉलीवूड करिअरमध्ये केवळ तीनच चित्रपट हिट ठरले आहेत.
रुपेरी पडद्यावर आमिषाची जादू चालली नसली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र घायाळ होत असतात. पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळते.