Amazon Responds : कर्मचारी कपातीवर ॲमेझॉनचा कामगार मंत्रालयाकडे खुलासा; म्हणे ‘राजीनामे ऐच्छिक’

Amazon Responds : कर्मचारी कपातीवर ॲमेझॉनचा कामगार मंत्रालयाकडे खुलासा; म्हणे ‘राजीनामे ऐच्छिक’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: ॲमेझॉन इंडियाने कर्मचारी कपात केल्यानंतर कर्मचारी संघटना नॅससेंट इन्फार्मेशन टेक्नोलाजी इंम्प्लाईज सीनेटने (एनआयटीएस) ॲमेझॉन इंडिया विरोधात तक्रार केली होती. यामध्ये संघटनेने कंपनीने कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे केला होता. यानंतर भारताच्या केंद्रीय कामगार मंत्रालयाने या कंपनीला समन्स पाठवला होतो. या समन्सवर ॲमेझॉन इंडियाने कर्मचाऱ्यांचे 'राजीनामे ऐच्छिक' असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही कर्मचार्‍याला काढून टाकलेले नाही. कंपनीने असा कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ज्यांनी स्वत:हून राजीनामे कंपनीकडे दिले आहेत. त्यांनी जास्त पॅकेज स्वीकारल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय स्वत:हून घेतला असल्याचेही कंपनीने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

Amazon Responds : आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात

सध्या अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका जाणवत आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. Amazon लाही याचा सामना करावा लागत असल्याने कंपनीने गेल्या आठवड्यात तब्बल 10 हजार कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर सध्या पुन्हा भारतीय कर्मचा-यांना त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगितले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आर्थिक लाभासह काम सोडण्यास सांगितले आहे. नजीकच्या काळातही आणखी काही कर्मचारी कपात केली जाण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून कामगार मंत्रालयाच्या समन्सला उत्तर

कामगार मंत्रालयाने ॲमेझॉन इंडियाला पुराव्यांसह वैयक्तिकरित्या अथवा प्रतिनिधीच्या माध्यमातून बंगळूरमधील कामगार उपायुक्तांसोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. या तक्रारीच्या आधारे कंपनीला नोटीस बजावण्यात आले होते. त्यानंतर ॲमेझॉन इंडियाने कामगार मंत्रालयाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. कंपनीने मंत्रालयाला उत्तर सादर करत कर्मचाऱ्यांचा राजीनामा हा ऐच्छिक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

2023 मध्येही देखील नोकर कपात सुरूच

ॲमेझॉनच्या कर्मचारी कपातीचा जागतिक स्तरावर देखील परिणाम झाला आहे. कंपनीने नुकतेच असेही सांगितले आहे की, कंपनीत नोकरी कपात लवकरच लागू होईल आणि ती 2023 मध्येही देखील सुरू राहू शकते. नोकऱ्या कपातीची नेमकी संख्या अद्याप माहित नसली तरी, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार Amazon 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news