

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सुमारे 3,700 जणांना अचानक काढून टाकण्याच्या एलॉन मस्क यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (Twitter Layoffs)
फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन करून पुरेशी सूचना न देता कंपनी आम्हाला काढून टाकत आहे, असे म्हणत काही कर्मचार्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. खटला दाखल झाल्याबद्दल ट्विटरने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (Twitter Layoffs)
शुक्रवारपासून कर्मचारी कमी करण्याचा कंपनीचा मानस आहे, असे ट्विटरने कर्मचार्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते. गेल्या महिन्यात एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये हा प्लॅटफॉर्म विकत घेतला आणि त्यानंतर खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली होती.
अधिक वाचा :