Amazon India कडून देशातील १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ -रिपोर्ट

Amazon India कडून देशातील १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ -रिपोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील दिग्गज ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. एका रिपोर्टनुसार, ॲमेझॉनने जाहीर केलेल्या जागतिक नोकरकपातीचा भाग म्हणून ॲमेझॉन इंडिया (Amazon India) देशातील १ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. यामुळे १ हजार कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणार आहे, असे वृत्त CNBC TV-18 ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Amazon.com Inc एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी गुरुवारी (IST) कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका नोटमधून सूचित केले होते. आर्थिक मंदीमुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरुच आहे. आता ऑनलाइन ॲमेझॉन (Amazon) १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
या नोकरकपातीचा मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या ई-कॉमर्स आणि मानव संसाधनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नोकरकपातीच्या यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांशी कंपनी १८ जानेवारीपासून संपर्क साधण्यास सुरुवात करणार आहे. ज्या १८ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे ते Amazon च्या अंदाजे ३ लाख कॉर्पोरेट कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणारे ६ टक्के कर्मचारी आहेत.

जॅसी यांनी नोटमध्ये म्हटले आहे की वार्षिक नियोजन अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे अधिक कठीण झाले आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे. अॅमेझॉनमध्ये वेअरहाऊस कर्मचार्‍यांसह १५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. अॅमेझॉनने आधी १० हजार नोकरकपातीचे लक्ष्य ठेवले होते. आता याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी ॲमेझॉनने केली आहे. नोव्हेंबरपासून ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरु आहे. (Amazon India)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news