Alia Bhatt :आई झाल्यावर आलिया दिसली पार्टीत, सासू नीतूसोबत..(video)

आलिया
आलिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने लग्नानंतर काल मुंबईत ग्रॅड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली. खास करून या पार्टीत न्यू मॉम आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची सासू नीतू कपूरने पार्टीत चारचाँद लावले. या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यानंतर चाहत्यांनी एकीकडे सासू- सुनेच्या जोडीचे भरभरून कौतुक केलं. तर दुसरीकडे आलिया पती आणि अभिनेता रणबीर कपूरची आठवण काढताना दिसतेय.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा याच्या लग्नाच्या पार्टीत अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली मात्र, चर्चा फक्त आलिया आणि तिची सासू नीतू कपूरची झाली. या पार्टीत आलियाने ग्रे कलरची ट्रान्सपरंट नेट हेवी वर्क असणाऱ्या शिमरी साडीत तर नीतू कपूर ग्रीन-येलो- मेहरुन कलरच्या फ्लावर प्रिंट सूटमध्ये दिसली. या पार्टीत दोघेजणी पहिल्यांदा एकमेकांना आलिंगन देताना दिसले. पॉपराझीच्या कॅमेऱ्याला दोघे पोझ देताना दिसले. याशिवाय दोघीजणी सोबत पार्टीत प्रवेश करतात. यावेळी नीतू-आलिया या सासू-सुनेची बॉन्डिंग दिसतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी सासू-सुनेचे भरभरून कौतुक केलं तर दुसरीकडे हे फोटो पाहून चाहत्यांनी आलिया पती आणि अभिनेता रणबीर कपूरची आठवण काढली आहे. यात एका युजर्सने पार्टीत रणबीर कोठे आहे? अशी विचारणा केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास आलिया सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात दिसली होती. यानंतर आलिया- सिद्धार्थ याच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. तर नीतू कपूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जुग जुग जियो' या चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवनसोबत दिसल्या.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news