Kamal Haasan : जात माझा मोठा राजकीय विरोधक : कमल हसन

Kamal Haasan : जात माझा मोठा राजकीय विरोधक : कमल हसन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जात हा माझा एक महत्त्वाचा प्रतिस्पर्धी असून मोठा राजकीय विरोधक आहे. मानवाने एकमेकांशी लढण्यासाठी वापरलेले क्रूर शस्त्र म्हणजे जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन पिढ्यांपूर्वी जातीला राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता तसे होताना दिसत नाही, असे मत अभिनेते आणि मक्कल निधी मैयामचे अध्यक्ष कमल हसन  (Kamal Haasan) यांनी आज (दि.१३) व्यक्त केले.

दिग्दर्शक पा. रणजीत यांनी चेन्नई येथे सुरू केलेल्या 'नीलम बुक्स' या पुस्तकांच्या दुकानाचे उद्घाटन कमल हसन (Kamal Haasan)  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मी 21 वर्षांचा असल्यापासून हे सांगत आलो आहे आणि आजही सांगत आहे. माझे मत कधीच बदलले नाही. आपण जे निर्माण केले ते आता आपल्यावर आक्रमण करत आहे, हे सत्य आपण स्वीकारू शकत नाही. देवाने मानवतेची निर्मिती सर्वोत्तम निर्मिती म्हणून केली आहे. परंतु जात हे एक भयंकर हत्यार आहे. डॉ. आंबेडकरांसारखे नेतेही यासाठी लढले होते. शब्दलेखन भिन्न असू शकतात, परंतु मैयाम आणि नीलम एक आहेत, ध्येय एकच आहे, असे सांगून या शब्दांमधील समानतेवर कमल हसन यांनी जोर दिला.

दरम्यान, कमल हसन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. त्याचबरोबर ते राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी २०१८ मध्ये मक्कल नीधी मैयम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. देशातील विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news