अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ठार

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला करत अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा खात्मा केला. ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणारा जवाहिरी हा ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-कायदाच नेतृत्व करत होता. मोस्ट वॉंटेड अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचे बक्षिस ठेवले होते. जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले होते. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे घुसून ही मोठी कारवाई केली. यावेळी ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला. इजिप्तमधील डॉक्टर अयमान अल जवाहिरीने ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यात समन्वय साधण्यासाठी मदत केली होती. तेव्हा चार विमानांचे अपहरण करण्यात आले होते. तसेच न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर केलेल्या हल्ल्यात तीन हजार लोक मारले गेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घुसून सीआयएद्वारे ड्रोन हल्ला केला आहे.

अफगाणिस्तानमध्ये सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या आयमान अल-जवाहिरी ठार झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे. "न्याय मिळाला आहे आणि दहशतवादी नेता अल-जवाहिरी मारला गेला आहे," असे बायडेन यांनी व्हाइट हाऊसच्या बाहेर विशेष टेलिव्हिजन भाषणातून जाहीर केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news