Akshay-Twinkle : ‘मी तिच्यासोबत १२ वर्षे घालवली, ती आता राहिली नाही’

akshay kumar and twinkle dog cleo
akshay kumar and twinkle dog cleo

पुढारी ऑनलाईन

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (Akshay-Twinkle) यांची नावे नेहमीच चित्रपटसृष्टीतील श्वानप्रेमींमध्ये गणली जातात. बर्‍याच वेळा, ट्विंकल आणि अक्षय (Akshay-Twinkle) त्यांच्या डॉगीचे फोटो, व्हिडिओज पोस्ट करतात. आता, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या घरी दु:खद घटना घडलीय, या सेलेब जोडप्याच्या क्लियो नावाच्या जर्मन शेफर्डचे निधन झाले आहे. इन्स्टाग्रामवर ट्विंकलने तिच्या डॉगीसोबतच्या आठवणीतील व्हिडिओ शेअर करून भावूक पोस्ट लिहिलीय.

अक्षय-ट्विंकलची क्लिओ निघून गेली

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या दोघांनीही अनेकदा त्यांच्या डॉगीचे फोटो शेअर केले आहेत. २०१४ मध्ये अक्षय आणि ट्विंकलने त्यांचे पाळीव प्राणी ओकी गमावला. त्यानंतर तिने क्लियोला त्यांच्या फॅमिलीत आणले. क्लियो अनेकदा या सेलिब्रिटी कपलच्या इंस्टाग्राम फोटोट पोस्टमध्ये दिसायची.

७ मार्च रोजी ट्विंकलने तिच्या फॉलोअर्सला सांगितले की, तिने तिचा डॉगी गमावला आहे. एक व्हिडिओ शेअर करताना ट्विंकलने लिहिले आहे की, "आमच्या सुंदर क्लिओचे निधन झाले. आम्ही तिच्यासोबत अद्भुत १२ वर्षे घालवली. मला माहित नाही की,हृदय एकाचवेळी कसे जड आणि रिकामे वाटू शकते, परंतु ते झालंय.

सेलिब्रिटींनी इन्स्टाग्राम पोस्टवर दिल्या प्रतिक्रिया

अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर Cleo ला श्रद्धांजली वाहिलीय. डब्बू रतनानी, अथिया शेट्टी, अमृता अरोरा, टिस्का चोप्रा यांनी ट्विंकलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत क्लिओला श्रद्धांजली वाहिलीय.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news