नाशिक (निफाड) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत रायगड किल्ल्याजवळ राहणार्या एका शूर आणि अद्भुत आईची महती हिरकणीच्या रूपाने बहुतेक जणांनी ऐकली, वाचली किंवा चित्रपटाच्या माध्यमातून पाहिली असेल… लोकशाहीत महिलांना पुरुषांच्या बरोेबरीने अधिकार आहेत. तसेच ती सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतेे.
महावितरणच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड उपविभागात नोकरीस असलेल्या अशाच शिल्पा बच्छाव या आपल्या सात महिन्यांच्या रांगत्या तान्हुल्याला कधी घरी सोडून, तर कधी सोबत घेत जिवाची पर्वा न करता कित्येक फूट उंचीच्या विजेच्या खांबावर, रोहित्रांवर चढून वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करतात. आपल्यातील आईपणाबरोबरच सामाजिक कर्तव्य जोपासणार्या या माउलीला महिलादिनी मानाचा मुजरा…