आकांक्षा दुबे प्रकरण : बॉयफ्रेंड समर सिंह गाजियाबादहून अटकेत

akanksha dube
akanksha dube
Published on
Updated on

पुढारी ऑनलान डेस्क : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे २६ मार्च रोजी एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यापूर्वी काही तासआधी आकांक्षा इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. यावेळी ती निराश झालेली दिसली होती. आता तिच्या मृत्यूच्या १२ दिवसांनंतर पोलिसांनी आकांक्षाचा बॉयफ्रेंड समर सिंहला गाजियाबादमधून अटक केलीय.

रिपोर्ट्सनुसार, वाराणसी क्राईम ब्रँचने समर सिंहला गाजियाबादहून अटक केलीय. आता पोलिस त्याला न्यायालायात हजर करून रिमांडसाठी बनारस घेऊन जाण्याची तयारी करत आहेत. समर सिंहचा भाऊ संजय सिंहवरदेखील आकांक्षा केसमध्ये अनेक आरोप लागले आहेत.

आकांक्षाच्या आईने समर सिंहवर केल होते आरोप

रिपोर्टनुसार, आकांक्षाची आई मधु दुबेने २७ मार्च रोजी भोजपुरी गायकाविरोधात केस दाखल केली होती. आकांक्षाच्या आईने आरोप केला होता की, त्यांची मुलगी आकांक्षाने समरसोबत तीन वर्षे काम केलं. पण, त्याने एक पैसा देखील दिला नाही. त्यांनी प्राथमिक माहिती दिली होती की, समरकडे मुलीचे ३ कोटी रुपये होते आणि जेव्हा आकांक्षा पैशांचा विषय काढायची, तेव्हा तो तिला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. अन्य कलाकारांसोबत ती काम करण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तो त्रास द्यायचा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news