सुपरक्यूट जोडी अमेय-वैदेहीसह अजय-अतुल येणार कोल्हापूरकरांच्या भेटीला

सुपरक्यूट जोडी अमेय-वैदेहीसह अजय-अतुल येणार कोल्हापूरकरांच्या भेटीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुनीत बालन स्टुडिओनिर्मित 'जग्गू आणि जुलिएट' या चित्रपटातील जग्गूची भूमिका साकारणारा अमेय वाघ आणि जुलियटची भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी या सुपरक्यूट जोडीसह प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, निर्माते पुनीत बालन यांच्यासह दिग्गज कलाकार सोमवारी (दि. ६) कोल्हापूरकरांच्या भेटीला येणार आहेत. या कलाकारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा योगही कोल्हापूरकरांना दै. 'पुढारी'च्या माध्यमातून येणार आहे.

'पुनीत बालन स्टुडिओज्'ने यापूर्वी निर्मिती केलेल्या सामाजिक विषयावरील 'मुळशी पॅटर्न' च्या सुपरहिट यशानंतर आता 'जग्गू आणि जुलिएट'च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही सर्व कलाकार मंडळी आणि निर्माते व युवा उद्योजक पुनीत बालन येत्या सोमवारी कोल्हापुरात येणार आहेत. या वेळी विविध ठिकाणी भेट देऊन या 'जग्गू आणि जुलिएट' चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.

कोळीवाड्याचा लाडका जगदीश ऊर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांच्या भन्नाट प्रेमकथेची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. दोन भिन्न स्वभावाच्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आलेले जग्गू आणि जुलिएट एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमात रंग भरण्यासाठी इतर पात्रे काय काय करामती करतात आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळणार आहे. अभिनेता अमेय वाघची नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या ढंगाची भूमिका या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. त्याच्या अतरंगी संवादामुळे त्याची भूमिका बहारदार दिसत आहे. तसेच वैदेही परशुरामीने पुन्हा एकदा कलरफुल दिसत, आपल्या हास्याने प्रेक्षकांची मने पुन्हा एकदा घायाळ केली आहेत. तर अजय-अतुल या जोडीची वेगवेगळ्या जॉनरची गाणी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतील. त्यामधील नुकतेच रिलीज झालेले 'भावी आमदार' हे गाणे रिलीज झाल्या झाल्या जोरदार व्हायरल झालेय. अमेय – वैदेहीसोबतच हृषीकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनील अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणुका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शहा अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे. त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. पुनीत बालन स्टुडिओनिर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा हा चित्रपट आहे.

दै. 'पुढारी' आणि 'रेडिओ टोमॅटो वर सर्व अपडेट 6 'जग्गू आणि जुलिएट' या चित्रपटातील या सर्व स्टार कलाकारांच्या कोल्हापूर भेटीची सर्व अपडेट आणि या कलाकारांना नक्की कसे भेटता येईल, यासंबंधीची सर्व माहिती आणि अपडेट तुम्हाला दै. 'पुढारी' आणि 'रेडिओ टोमॅटोच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही 'पुढारी' आणि 'टॉमेटो'च्या संपर्कात राहा आणि सर्व काही अपडेट मिळवा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news