Agni- 5: अग्नी-५ क्षेपणास्त्राची मारक क्षमता आता ५ वरून ७ हजार किलोमीटरवर

Agni- 5: अग्नी-५ क्षेपणास्त्राची मारक क्षमता आता ५ वरून ७ हजार किलोमीटरवर
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भारताचे सर्वाधिक दीर्घ पल्ल्याचे म्हणून ओळखले जाणारे अग्नी-५ हे क्षेपणास्त्र आता अधिक क्षमतेने मारा करणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ हजार किलोमीटरवरून आता ७ हजार किलोमीटर (Agni- 5) करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) क्षेपणास्त्रातील पोलाद हटवून त्याजागी कम्पोफिट मटेरियलचा वापर केल्याने ही किमया झाली आहे. 'डीआरडीओ'च्या या प्रयोगाने क्षेपणास्त्राचे वजन तब्बल २० टक्क्यांनी कमी झाल्याने क्षेपणास्त्राच्या पल्ल्यातील ही वाढ शक्य झाली.

'डीआरडीओ'च्या (Agni- 5) सूत्रांनी सांगितले की, या क्षेपणास्त्राची सध्याची मारक क्षमता आता ७ हजार किमी झाली आहे. भारतातील अण्वस्त्रांचा कार्यक्रम प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानसह इतर शत्रूंविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वत:हून भारत प्रथम क्षेपणास्त्र वापरण्याचे धोरण कधीच अवलंबत नसल्याचे म्हटले आहे.

Agni- 5 : भारत स्पेसमधील आपली शक्ती वाढविण्याच्या मार्गावर

भारत आपली दुसरी स्ट्राइक क्षमता बळकट करत आहे आणि पाणबुडीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासावर काम करत आहे. नवीन जास्तीत जास्त संभाव्य श्रेणीसाठी क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताने गुरुवारी 5,400 किमी अंतरापर्यंतच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची रात्री यशस्वी चाचणी घेतली. पूर्वीपेक्षा आता हलके असलेल्या क्षेपणास्त्रावरील नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रमाणित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news