बसपाचं अस्तित्व धोक्यात; उत्तर प्रदेश निकालानंतर मायावतींनी व्यक्त केली चिंता

बसपाचं अस्तित्व धोक्यात; उत्तर प्रदेश निकालानंतर मायावतींनी व्यक्त केली चिंता

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निकालावर विरोधी पक्षांकड़ून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या निवडणुकीत बसपाला केवळ एकच जागा मिळाली आहे. यावर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती (mayavati) यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

त्या (mayavati) म्हणाल्या की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. या निकालाचा धडा घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. या निवडणुकीत बसपाला भाजपची बी टीम म्हणून हिणवण्यात आले. परंतु, हे पूर्णपणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात बसपाला बलियाच्या रसरा जागेवरच विजय मिळवता आला. त्याचबरोबर पूर्ण राज्यात मुस्लिम समाजाचे मतदान समाजवादी पक्षाला मिळाले. तसेच भाजपवर नाराज असणाऱ्या हिंदूंचे मतदानही बसपाला मिळाले नाही. माझ्याविरोधात जातीयवादी मीडियाच्या माध्यमांतून अपप्रचार करण्यात आला की, बसपा भाजपची बी टीम आहे.

काँग्रेसवर निशाणा साधताना मायावती म्हणाल्या की, २०१२ च्या आधी उत्तर प्रदेशमध्ये भाजप मजबूत नव्हता. परंतु काँग्रेसमुळेच भाजपची आता ताकद वाढली आहे. रसडा विधानसभेच्या जागेवर एकमेव उमाशंकर सिंह यांनी बसपाचा झेंडा लावला आहे. एक्झिट पोलमध्येही बसपाला दहापेक्षा कमी जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले. विशेष म्हणजे अनेक जागांवर बसपाच्या उमेदवारांची डिपॉझिटही जप्त झाली आहे. या निवडणुकीत बसपाला एका जागेवर विजय मिळाला आहे. तर भाजपने २५५ जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाले तर निषाद पक्षाला ६ तर अपना दलाला १२ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या खात्यात १११ जागा आल्या आहेत. सपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाला ८ तर राजभरच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये २२ टक्के दलित समाज आहे. बसपाला यावेळी १३ टक्के मते मिळालेली आहेत. १९९३ नंतर सर्वात कमी मते मिळालेली आहेत. एक जागा मिळाल्यामुळे बसपाची सर्वात खराब कामगिरी झालेली आहे. यावरून पक्षाचा मूळ मतदार पक्षापासून दूर गेला असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे पक्षाची पुढील राजकीय वाटचाल अवघड झालेली आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जाही धोक्यात आलेला आहे. त्याचवेळी विधिमंडळ ते संसदेपर्यंत प्रतिनिधीत्वाचे संकट निर्माण झाले आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?  

पहा व्हिडिओ : पुन्हा भाजपाची सत्ता – काय म्हणतायत केशव उपाध्ये ? | Keshav upadhye on UP's Election

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news