Chandrayaan 3 Moon Landing | चांद्रयान-३ च्या लँडरमधून खाली उतरला रोव्हर, चंद्रावर मारला फेरफटका!

Chandrayaan 3 Moon Landing | चांद्रयान-३ च्या लँडरमधून खाली उतरला रोव्हर, चंद्रावर मारला फेरफटका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने आज (दि.२३) इतिहास रचला. अखेर ४० दिवसांचा प्रवास करत चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काल सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग झाले. त्यानंतर लँडरमधून रोव्हर बाहेर पडला. (Chandrayaan 3 Moon Landing) चांद्रयान-३ चे रोव्हर लँडरवरून खाली उतरले आणि
त्याने चंद्रावर फेरफटका मारला! अशी माहिती इस्रोने एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली आहे.

Chandrayaan 3 Moon Landing : रोव्हर प्रज्ञान म्हणजे काय ?

प्रज्ञान रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर फिरून त्याची छायाचित्रे गोळा करेल. या रोव्हरवर इस्रोचा लोगो आणि तिरंगा लावण्यात आला आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चार तासांनी लँडरमधून बाहेर पडले. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरेल. यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्रावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल. रोव्हर चंद्राच्या हवामानाची माहिती घेईल. त्यात असे पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल.

चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं प्रमाण देखील शोधण्याचं काम तो करेल. रोव्हर अशा पद्धतीने बनविण्यात आलाय की तो चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करू शकेल. रोव्हर ही माहिती गोळा करून लँडरला पाठवेल. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरकडे दोन आठवड्यांचा वेळ असणार आहे. रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत ही माहिती केवळ लँडर मार्फतच पोहचू शकते.

चंद्रावर उमटल्या भारतीय अशोक स्तंभ, इस्रोच्या खुणा

चांद्रयान-३ मोहीम फत्ते करत, इस्रोने आज नवीन इतिहास रचला आहे. चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर रोव्हर खाली उतरले. यानंतर रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या विश्वविक्रमाच्या खूणा उमटवल्या. रोव्हरने भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) खुणा साकारल्या आहेत.

साऱ्या जगताला उत्सुकता असलेली भारतीय चांद्रयान-३ मोहीम अखेर फत्ते झाली आहे. यानंतर चांद्रयान-3 लँडिंग होताच भारताने दोन विक्रम प्रस्थापित केले. यातील पहिला विक्रम म्हणजे सॉफ्ट लँडिंग यशस्वी केले. तर दुसरा विश्वविक्रम म्हणजे अमेरिका, रशिया व चीननंतर भारत असा अंतराळ पराक्रम गाजवणारा चौथा देश ठरला. या यशस्वी मोहीमेनंतर चांद्रयान-3 चंद्रावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारले आहे.

 चंद्रावर पोहोचताच असा बनणार 'अशोक स्तंभ!'

या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडरवरून रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवले. यानंतर इस्रो कमांड देईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगोच्या पाऊल खुणा रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर साकारल्या आहेत. अशारीतीने इस्रोने चंद्रावर अखेर भारताची मोहर उमटवली आहे.

बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून झेपावलेले चांद्रयान ४० दिवसांनी चंद्रावर उतरले. बंगळूरच्या 'इस्रो'च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळण्यात आली. चांद्रयान-२ मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करून ही मोहीम आखण्यात आल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत चांद्रयान चंद्रावर उतरेल, याची वैज्ञानिकांना खात्री होती. रशियाचे लुना हे चांद्रयान दोनच दिवसांपूर्वी कोसळल्याने भारताच्या मोहिमेवर आता सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. इस्रोसोबतच नासा आणि युरोपियन अंतराळ संस्था या मोहिमेवर लक्ष ठेवून होत्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news