chandrayaan 3 landing : ‘उड्डाण’ ते ‘मोहीम फत्ते’…जाणून घ्या चांद्रयान-३ चे मोहिमेतील महत्त्‍वाचे टप्‍पे | पुढारी

chandrayaan 3 landing : 'उड्डाण' ते 'मोहीम फत्ते'...जाणून घ्या चांद्रयान-३ चे मोहिमेतील महत्त्‍वाचे टप्‍पे

पुढारी ऑनलाईन: अवघ्या विश्वाचे लक्ष असलेल्या भारताच्या चांद्रयान-३ मोहीम अखेर फत्ते झाली आहे. १४ जुलै दुपारी सुरू झालेला प्रवास अखेर आज महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहचला. चाद्रयानाचे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्थिरावले आहे. यानंतर देखील चांद्रयानाचा प्रवास सुरूच राहणार आहे. यामधून रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरून पुढील प्रक्रियेला सुरूच राहणार आहे. चला जाणून घेऊया चांद्रयान-३ च्या ‘उड्डान’ ते ‘मोहीम फत्ते’ इथपर्यंतचा प्रवास (chandrayaan 3 landing) कसा होता?

chandrayaan 3 landing: ‘चांद्रयान-3’ मोहिमेतील घटनाक्रम…

6 जुलै : इस्रोने मिशन चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून 14 जुलैला रवाना होईल असे जाहीर केले.

7 जुलै : सर्व इलेक्ट्रिकल चाचण्या यशस्वी.

11 जुलै : सर्व लाँचिंग प्रक्षेपणाची रिहर्सल घेण्यात आली.

14 जुलै : एलव्हीएम 3 एम 4 चांद्रयान-3 मोहिमेवर रवाना. (chandrayaan 3 landing)

15 जुलै : कक्षा वाढवण्याचा पहिला टप्पा सर.

17 जुलै : दुसर्‍या कक्षेत यशस्वी प्रवेश.

25 जुलै : चांद्रयान-3 चौथ्या कक्षेत पोहोचले.

1 ऑगस्ट : यानाची चंद्राच्या कक्षेजवळ झेप.

5 ऑगस्ट : यानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश.

6 ऑगस्ट : कक्षेत पोहोचल्यानंतर हळूहळू खाली येण्यास सुरुवात.

14 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या भूपृष्ठानजीक पोहोचले.

16 ऑगस्ट : चांद्रयानाचा पाचव्या व शेवटच्या कक्षेत प्रवेश.

18 ऑगस्ट : डिबुस्टिंग ऑपरेशनची सांगता.

23 ऑगस्ट : सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सारे काही नियोजनाप्रमाणे पार पडले. यानाने 30 कि.मी. अंतर कापून चंद्रावर यशस्‍वी लँडिंग करत नवा इतिहास रचला.

Back to top button