Priyanka Chopra | लग्नानंतर प्रियांकाचा ब्रेकअप आणि डेटिंगवर खुलासा, एक्स बॉयफ्रेंडचं केलं कौतुक

Priyanka Chopra
Priyanka Chopra

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या आगामी 'लव्ह अगेन' चित्रपट आणि 'सिटाडेल' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 'लव्ह अगेन' या चित्रपटात प्रियांकाने हॉलिवूड स्टार सॅम ह्यूघन याच्यासोबत दमदार भूमिका साकारली. दरम्यान प्रियांकाने नुकतेच ॲलेक्स कूपरच्या 'कॉल हर डॅडी' पॉडकास्टवर दिलखुलास संवाद साधला. या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील ब्रेकअपचे अनेक खुलासे केले आहेत.

देसी गर्ल प्रियांका चोप्राने ( Priyanka Chopra ) बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ला सिद्ध केलं आहे. प्रियांका जेव्हा हिंदी चित्रपटात काम करत होती तेव्हा तिचे नाव शाहिद कपूर, हरमन बवेजा आणि शाहरुख खान यासारख्या अनेक कलाकारंसोबत जोडले गेले होते. दरम्यान प्रियांकाने 'कॉल हर डॅडी' मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या डेटिंग आणि ब्रेकअपबद्दलची माहिती दिली आहे.

या मुलाखतीत प्रियांकाला तिचा जोडीदार निवडण्याचा पॅटर्न काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने सांगितले आहे की, 'मी कामासाठी एकामागून एक अभिनेत्यांना डेट करत होते, या काळात स्वत:ला वेळ देवू शकले नाही. चित्रपटाच्या सेटवर जे कलाकार माझ्या संपर्कात होते त्याच्याशी मी डेट केलं आहे. त्यामुळे खरं नातं कसे असावे याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीच त्याच्या शोधत राहिले.'

ब्रेकअपबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, 'ब्रेकअप झाल्यानंतरचा तो कठीण काळ होता. माझ्या आयुष्यात आलेले सगळेच बॉयफ्रेड चांगले आहेत. मी ज्यांना- ज्यांना डेट केले त्या सर्वाचे कौतुक करते.' यानंतर प्रियांकाने तिच्या आणि निकच्या नात्याबद्दल सांगितले की, जेव्हा मी निक जोनासला डेट करायला सुरुवात केली तेव्हा मला खऱ्या नात्याची कल्पना आली. दरम्यान मी एक्स बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं आणि कामावर लक्ष केंद्रित करायचे ठरविले.

'कुटुंब एकत्रित ठेवायचंय आणि नवरा घरी आल्यावर त्याला आनंद द्यायचं हेच शिकवलं जात होतं. यामुळे मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होते.' असेही तिने सांगितले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, प्रियांका 'सिटाडेल' वेब सीरिज आणि 'लव्ह अगेन' चित्रपटात दिसणार आहे. तर फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये प्रियांका कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news