Anushka Sharma : अनुष्काला चुकून 'सर' म्हणताच विराटनं केलं असं... | पुढारी

Anushka Sharma : अनुष्काला चुकून 'सर' म्हणताच विराटनं केलं असं...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा  ( Anushka Sharma ) आणि पती क्रिकेटर विराट कोहली त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. दरम्यान हे क्यूट कपल काल मुंबईच्या रेस्टारंन्टमध्ये डिनर डेट पोहोचले होते. मात्र, यावेळी अनुष्काच्याबाबतीत एक वेगळाच आणि गंमतीशीर किस्सा घडला.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि विराट दोघेजण काल मुंबईच्या हॉटेलमध्ये डिनर डेटवर गेले होते. यावेळी अनुष्काने व्हाईट कलरचा फुल क्रीम ड्रेसमध्ये तर विराट प्रिंटेड शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये एकदम हॅडयम दिसला. दोघेजण पहिल्यादा त्याच्या कारमधून खाली उतरतात. यानंतर दोघांनी पापॉराझीच्या कॅमेऱ्याला हटके पोझ दिली. यावेळी खास करून पापॉराझीच्या कॅमेऱ्यावाल्यांनी अनुष्का गंमतीने आणि चुकून ‘सर’ म्हणून हाक मारतात. या घटनेने विराट मात्र आश्चर्यचकित होवून जोरात हसतो आणि अनुष्काला घेवून तो हॉटेलच्या आतमध्ये जातो.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. या व्हिडिओला आतापर्यत ३७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अनुष्का आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

(video : manav.manglani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Back to top button