Priyanka Chopra
Priyanka Chopra

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा पुन्हा प्रेमात

Published on

पुढारी ऑनलाईन : हॉलीवूडकडे आपला मोर्चा वळवणारी प्रियांका चोप्रा 'लव्ह अगेन' या नव्या चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरली. एएमसी लिंकन स्क्वेअर थिएटरमध्ये आयोजित या शोमध्ये चित्रपटातील मुख्य अभिनेता सॅम ह्यूगन, तसेच प्रियांकाचा पती निक जोनास हेदेखील जातीने उपस्थित होते.

मेट गालामधील आपल्या स्टनिंग लूकने घायाळ करणाऱ्या प्रियांकाने 'लव्ह अगेन' च्या प्रीमियरमध्येही ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ऑफ शोल्डर बेबी ब्लू गाऊन तिच्या सौंदर्यात आणखी भर घालणारा होता. 'लव्ह अगेन' या रोमेटिक कॉमेडी चित्रपटात निक जोनासचीदेखील छोटी भूमिका आहे. मुख्य भूमिकेत असणारा स्कॉटिश कलाकार सॅम ह्यूगन 'आऊटलैंडर' या आपल्या वेब सीरिजसाठी खास ओळखला जातो. 'लव्ह अगेन' चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जिम स्ट्राऊस यांचे असून हा चित्रपट दि. १२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news