Rajinikanth-Amitabh : तब्बल ३२ वर्षानंतर पुन्हा रजनीकांत- अमिताभ बच्चन दिसणार एकत्र!

Rajinikanth-Amitabh
Rajinikanth-Amitabh

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रजनीकांत लवकरच त्याचा आगामी 'जय भीम' चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात खास करून बिग बी आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन दिसणार असणार असल्याची माहिती समोर आली आहे. असे जर घडले तर तब्बल ३२ वर्षांनी हे दोन सुपरस्टार ( Rajinikanth-Amitabh ) पुन्हा एकदा एकत्रित पडद्यावर धुमाकूळ घालतील यात काही शंका नाही.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांतच्या जवळच्या एका सूत्राने त्याच्या आगामी 'जय भीम' चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. यावेळी या चित्रपटासाठी बिंग बी आणि अमिताभ बच्चन दिसणार ( Rajinikanth-Amitabh ) असल्याचा खुलासा केला आहे. या चित्रपटाबद्दल बिंग बींशी बोलणी सुरू असून लवकरच चित्रपटाची घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत्त माहिती रजनीकांत आणि बिग बी यांच्याकडून मिळालेली नाही.

या वृत्तानुसार, असे जर घडले तर तब्बल ३२ वर्षानंतर पुन्हा एकदा थलायवा रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्रित स्किन शेअर करणार आहेत. याआधी ते १९९१ मधील 'हम तुम' या चित्रपटात दोघेजण एकत्रित दिसले होते. तर दोघेजण हम तुमशिवाय 'गिरफ्तार' आणि 'अंधा कानून' या चित्रपटातही दिसले होते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, रजनीकांतने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. रजनीकांतचा हा १७० वा चित्रपट असल्याने त्याचे नाव 'थलायवा १७०' असे ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news