Aishwarya Rajinikanth: ऐश्वर्याच्या लग्नातील दागिने झाले चोरी | पुढारी

Aishwarya Rajinikanth: ऐश्वर्याच्या लग्नातील दागिने झाले चोरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : थलैवी रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने तेयनमपेट पोलिसांत एक तक्रार दाखल केलीय. या तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या चेन्नई येथील घरातून लॉकरमधून सोने आणि हिऱ्यांचे ६० दागिने गायब झाले आहेत. किमती वस्तूंची किंमत ३..६० लाख रुपये आहे आणि तिने २०१९ मध्ये बहिण सौंदर्याच्या लग्नासाठी उपयोग केला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऐश्वर्याने दागिने एका लॉकरमध्ये ठेवले होते. त्यांच्या घरच्या काही नोकरांना याची माहिती होती.

ऐश्वर्या रजनीकांतचा नोकर आणि ड्रायव्हरवर संशय

ऐश्वर्या रजनीकांत सध्या तिचा आगामी चित्रपट लाल सलामच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अभिनेत्री शूटिंगसाठी तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांचा दौरा करत आहे. ऐश्वर्या रजनीकांतने दागिन्यांच्या चोरी प्रकरणात टेयनमपेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत तिने म्हटलंय-तिने शेवटी २०१९ मध्ये दागिने पाहिले होते, जे तिने बहिण सौंदर्याच्या लग्नात घातले होते. लग्नानंतर दागिने एका लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते.

लॉकर २०२१ मध्ये तीन जागी शिफ्ट करण्यात आलं होतं. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी लॉकरला घरच्या अन्य साहित्यासोबत सीआयटी नगर येथील तिचा एक्स पती धनुषच्या फ्लॅटमध्ये पाठवण्यात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये चेन्नईच्या सेंट मेरी रोडवर तिच्या अपार्टमेंटमध्य़े स्थानांतरित करण्यात आलं. हे एप्रिल २०२२ मध्ये लॉकर पोएस गार्डन निवासात स्थानांतरित करण्यात आलं होतं. तर लॉकरच्या चाव्या सेंट मेरी रोडवरल तिच्या फ्लॅटमध्ये होती.

Back to top button