Adani Row : ‘केंद्र सरकार घाबरले’; राहुल गांधींनी अदानी समुहावर चर्चा करण्याचे दिले आव्हान

Adani Row : ‘केंद्र सरकार घाबरले’; राहुल गांधींनी अदानी समुहावर चर्चा करण्याचे दिले आव्हान

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अदानी समूहावरील फसवणुकीच्या आरोपांवरून केंद्र सरकार बॅकफूटवर असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अदानी मुद्द्यावर संसदेत कोणतीही चर्चा होऊ नये यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी असे सरकारला वाटत नाही, केंद्र सरकार चांगलेच घाबरले आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारला अदानीवर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. (Adani Row)

या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला. अदानींवर चर्चा होऊ नये यासाठी मोदीजी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे ते म्हणाले. लाखो कोटींचा भ्रष्टाचार होत असून एका माणसाने देशाच्या पायाभूत सुविधा हायजॅक केल्या, असे आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, आम्हाला अदानींच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. (Adani Row)

अदानींमागे कोणती ताकद

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानीमागे कोणती ताकद आहे, हे शोधून काढले पाहिजे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनीही अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. नियम 267 अन्वये या विषयावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत पंतप्रधान संसदेत चर्चा करण्यास सहमत होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचेही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले. दिग्विजय सिंह म्हणाले की, आम्हाला अदानी प्रकरणावर पंतप्रधान मोदींकडून स्पष्टीकरण हवे आहे. (Adani Row)

'हम दो हमारे दो की सरकार'

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, 'हम दो, हमारे दो' असे मी सरकारबद्दल खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे. हा मुद्दा मी २-३ वर्षांपासून मांडत आहे. 'दूध का दूध और पानी का पानी' व्हायला पाहिजे. लाखो कोटींच्या भ्रष्टाचारावर चर्चा व्हायला हवी. लाखो कोटींचा भ्रष्टाचार होत असून एका माणसाने देशाच्या पायाभूत सुविधा हायजॅक केल्या, असे राहूल गांधी यांनी आरोप केला.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news