Nitin Gadkari : राजकारणी लोक काही साधू-संत नसतात : नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : राजकारणी लोक काही साधू-संत नसतात : नितीन गडकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोफत अन्यधान्य, करामध्ये सूट अशाप्रकराची आश्वासने आणि कामे निवडणुकीचा विचार करुनच केली जातात. राजकारणी लोक काही साधू-संत नसतात, आम्ही पूजा-प्रार्थना करण्यासाठी आलेलो नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. (Nitin Gadkari)

नितीन गडकरी म्हणाले, नेते चांगली कामे केलीत तरच निवडणुकीत विजय मिळवू शकतात. प्रत्येक पक्ष अशाच प्रकारे काम करतो. त्यामुळेच आमचा जनेतेची कामे करण्यावर भर असतो. दक्षिणेतील राज्यांमध्ये तर मोफत वीज दिली जाते. त्याचा तोटा किती होईल, याचा विचार केला जात नाही. (Nitin Gadkari)

प्रत्येक राज्यामध्ये रस्त्यांची कामे सुरू – गडकरी (Nitin Gadkari)

यावर्षी ९ राज्यांमध्ये निवडणुका आहेत. निवडणुका आल्या की प्रकल्प सुरू करण्यात येतात, अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर देताना गडकरी म्हणाले, कोणते असे राज्य आहे, जिथे रस्त्यांची कामे सुरु नाहीत. पंजाबपासून सर्व राज्यांत ही कामे सुरू आहेत. दिल्ली-चंदीगढ मार्गावरही उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. (Nitin Gadkari)

हेही वाचंलत का?

Back to top button