पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास 'सेबी'कडून 'एसआयटी'कडे हस्तांतरित करण्याचे कोणतेही कारण नाही, असे आज (दि.३) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने 22 प्रकरणांचा तपास सेबीकडे सोपवला होता, त्यापैकी दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. उर्वरित दोन प्रकरणांची चौकशी 'सेबी'ने तीन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देशही दिले. या निकालामुळे अदानी समुहास मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स ( Adani Group Shares ) ११ टक्क्यांनी वधारले.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे आज शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी विक्रीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. बाजारात सर्वाधिक विक्री धातू आणि आयटी क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री पाहण्यास मिळात असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अदानी समूहाचे सर्व शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसत आहेत.
अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात व्यवहारात ५ टक्क्यांनी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. अदानी पोर्ट्समध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस, हे दोन्ही समभाग आज निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये ठरल्या. तसेच अदानी विल्मर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपन्यांचे शेअर्स 3 ते 11 टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा :