Vishakha Subhedar : खळखळून हसवणारी विशाखा आता ‘शार्प शूटर’ च्या भूमिकेत

Vishakha Subhedar
Vishakha Subhedar

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar ) सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. हातात बंदूक घेतलेलं तिचे बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा 'शूटर' ची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. विशाखाचा हा 'शूटर' अंदाज आगामी 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने 'मगरु' या 'शार्प शूटर' ची भूमिका साकारली असून यात त्या 'डॅशिंग रावडी लूक' मध्ये दिसणार आहेत.

संबंधित बातम्या  

या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने ( Vishakha Subhedar ) सांगितलं आहे की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारले आहे.

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांनी केली आहे.

विशाखासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदी चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पहिल्यांदा पदार्पण करीत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news