Veena Jagtap : लयभारी❤️; नाकात नथ, यलो साडी अन् वीणाच्या गालावर लाली…

Veena Jagtap
Veena Jagtap
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' फेम आणि अभिनेत्री वीणा जगताप नेहमी तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. कधी नऊवारी साडीत तर कधी सहा वारीत साडीत तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना पाहायला मिळतात. गेल्या गणपतीच्या उत्सवात तिच्या नवनवीन साड्याची क्रेझ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. सध्या पुन्हा एकादा 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग..' म्हणत वीणानं (Veena Jagtap ) मराठमोळा लूक शेअर केलाय.

गेल्या काही दिवसापूर्वीच बिग बॉसच्या घरात वीणा आणि शिव ठाकरेच्या रिलेशनशिप आणि लग्नाची चर्चा रंगली होती. परंतु, मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअप वृत्त समोर आले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. यानंतर वीणा सोशल मीडियावर सक्रिय होतं नवनवीन हॉट फोटोज शेअर करत असते.

अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap ) तिच्या इन्स्टाग्रामवर येलो आणि गुलाबी रंगाच्या सहावारी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. केसांची स्टाईल, नाकात नथ, कानात झुमके, गळ्यात भरजरी सोन्याच्या दागिन्याचा नेकलेस, मेकअप आणि गुलाबी लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '? साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग,, उशाखाली फोटो तुझा चांदरातीला, तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग ?' या गाण्याचे बोल लिहिले आहेत. यातील खास म्हणजे, वीणाच्या साडी आणि ब्लॉऊजवर खूपच सुंदर डिझाईन केलेले दिसतेय. या फोटोला वीणानं किलर पोझ दिली आहे. यासोबत तिच्या बाजूला निसर्गातील झाडांची फुले दिसतात.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच 'Beautiful ❤️❤️', 'Awesome❤️❤️❤️', 'Beautiful ❤️?', 'Wow So Beautiful looking Mam. Perfect Marathi Mulgi ???', 'So Beautiful My Cute Sweet Lovely Best' , 'Beautiful and gorgeous?❤️', 'Sundarrrr???', 'खुप सुंदर दिसतेस ?❤️', 'Extreme beauty', 'Looking Beautiful…….. Gergeous ❤️❤️❤️❤️??? So Cute, Ayee hyee?❤', 'lai Bhari diste ❤️', 'Omg?veenidi aapka to jawab nahi.।। So so beautiful looking di aap???', 'सुरेख…………?✌️?', 'So pretty❤️?', 'Khup chan distya ?', 'oo sweet',, 'lovely ??❤️', 'Looks Stunning ??', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलें आहे. याशिवाय वीणानं ब्लॅक रंगाच्या कपड्यातील फोटो शेअर केलं आहेत. वीणा छोट्या पडद्यावरील 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून प्रकाश झोतात आली होती. तर सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत 'अवंतिका कानिटकर'ची उत्तमरित्या भूमिका तिने साकारत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news