Shehnaaz Gill : हूश्श ❤️... शहनाजचं लाजणं आणि सुमधूर आवाज | पुढारी

Shehnaaz Gill : हूश्श ❤️... शहनाजचं लाजणं आणि सुमधूर आवाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसनंतर प्रकाश झोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ( Shehnaaz Gill ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले हॉट आणि बोल्ड व्हिडिओ, फोटो आणि रील्स शेअर करून चाहत्याच्या संपर्कात असते. सध्या शहनाजच्या अणखी एका व्हिडिओने पुन्हा चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलची एक वेगळी ओळख आहे. मध्यंतरी तिने आपले वजन कमी केल्याचे वृत्त मिळालं होते. शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोतही शहनाज पूर्वीपेक्षा स्लिम दिसत होती. याच दरम्यान शहनाजचे नवनवीन हॉट फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत.

नुकताच शहनाज गिलचा ( Shehnaaz Gill ) देसी लूकमधील एक हटके व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर झाला आहे. यात शहनाजने घातलेल्या आकाशी रंगाच्या पंजाबी शरारा ड्रेसमध्ये एकदम हॉट दिसतेय. केसांची स्टाईल, कानात रिंग्स, हातात बांगड्या आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने यलो रंगाचे पाच ईमोजी (⭐️ ⭐️ ⭐️ ⭐️ ⭐️) शेअर केले आहे.

यातील विशेष म्हणजे, शहनाजच्या गालावरील केसांच्या बटा, सिव्हलेस टॉप, तिचं लाजणं, हसणं, मूरडणं सर्वच अदा मनमोहक आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला गुरु रंधवाच्या ‘जिंद माही आजा वे, ओ सिने ला जावे… ‘ या पंजाबी गाण्याचे बोल वाजत आहेत. याच दरम्यान शहनाजने स्वत: च्या सुमधूर आवाजात ‘ना कुछ पुछां, ना कुछ मांगा, तुने दिलसे दिया जो दिया, ना कुछ बोला ना कुछ तोला, मुस्कुराके दिया जो दिया…. तुझमें रब दिखता है यारे मैं क्या करू. म्हटलं आहे. हे व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरले आहे.

‘Hey Love you ❤️’, ‘What A Magical Voice 🔥🔥🔥’, ‘Queen❤️❤️’, ‘❤️ always in our heart ❤️❤️’, ‘Bahut achae ❤️❤️’, ‘Looking so gorgeous 💙😍’, ‘Cutest punjaban😍🔥’, ‘Beautiful ❤️❤️❤️’, ‘Sohni kudi❤️’, ‘Prettiest Punjaban♥️ Born to Shine🌟’, ‘Uffff 😫🔥😍😍😍’, ‘Beautiful princess’, ‘Oye Punjaban ke mast lag reh ho’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शहनाज गिल लवकरच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याशिवाय शहनाज जॉन अब्राहमसोबतच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

Back to top button