Bandra : अभिनेता दिलीपच्‍या वाढदिनी तमन्नाकडून आगामी चित्रपटाचा लूक रिलीज

Bandra
Bandra

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री तमन्ना भाटियाने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता दिलीप स्टारर 'बांद्रा' ( Bandra ) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासा सज्ज झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमन्नाने आगामी 'बांद्रा' तमिळ या चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे.

अभिनेत्री तमन्नाने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रावर आगामी 'बांद्रा' ( Bandra ) तमिळ या चित्रपटातील दिलीपचा एक लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये बर्थडे स्टार दिलीप ब्लॅक रंगाच्या पँट आणि मॅचिंग शर्टसोबत तपकिरी रंगाच्या बूटांमध्ये एकदम हॅडसम दिसत आहे. यासोबत त्याच्या एका हातात बंदूक तर दुसऱ्या हातात सिगारेट दिसतेय.  दिलीप एका खुर्चीवर बसलेला असून, डोक्यावर लांब केस आणि दाढी वाढलेला दिसतेय. धमाकेदार पोस्टरवरून चित्रपट भीतीदायक असल्याचे बोलले जात आहे.

या लूकच्या कॅप्शनमध्ये तमन्नाने 'हॅपी बर्थडे दिलीप सर.☺️☺️☺️'. असे म्हटले आहे. अरुण गोपी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बांद्रा' या चित्रपटाचे शुटिंग केरळमधील अथिरापल्ली येथे केले आहे. तमन्ना आणि दिलीप यांच्यासोबत  ॲक्शन थ्रिलर चित्रपटात डिनो मोरिया, सरथ कुमार, सिद्दीक, राजीव अंकुर सिंग, अमित तिवारी, ईश्‍वरी राव, व्हीटीव्ही गणेश, लीना, आर्यन संतोष, दारासिंग खुराना, कलाभवन शाजोन आणि इतर कलाकार दिसणार आहेत. यामुळे तमन्नाच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'बांद्रा' या चित्रपटाशिवाय तमन्नाकडे अनेक चित्रपटाची ऑफर आहे. तमन्ना 'लस्ट स्टोरीज २' या आगामी प्रोजेक्टसाठी नुकतेच मुंबईत आली होती. तर लोकप्रिय ओटीटी कथासंग्रहाच्या सिक्वेलवर सध्या तिचे काम सुरू आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news