

पुढारी ऑनलाईन डेस्क : मसाल्यांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा 'बादशहा मसाले' डाबर कंपनीने विकत घेतले असून नुकतीच कंपनीने याची घोषणा केली आहे. बादशाह मसाला ही बलाढ्य कंपनी मिश्रित मसाले, कुटलेले मसाले, तसेच इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करण्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर डाबर इंडिया ही सुद्धा देशातील फूड बिसनेस मध्ये एक अग्रेसर कंपनी आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, डाबर कंपनीने बादशहा मासालेंचे ५१ टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला असून याबद्दलच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. यासाठी डाबरला तब्बल ५८७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. मूळ बादशहा मसाले कंपनीची किंमत ११५२ कोटी रुपये असून उर्वरित ४९ टक्के भाग भांडवल डाबर येत्या पाच वर्षात खरेदी करणार आहे.
बलाढ्य अशा बादशाह मसाले कंपनी खरेदीने डाबरचा व्यवसाय पुढील तीन वर्षात ५०० कोटींनी वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सप्टेंबर तिमाहीत डाबरचा निव्वळ नफा ४९० कोटींहून अधिक होता, तरीही कंपनीच्या एकत्रित नफ्यात घट दिसून आली होती.
हे वाचलंत का?