sonam kapoor : सोनम कपूर- आनंद आहुजाच्‍या घरी आला नवा पाहुणा 

sonam kapoor and anand ahuja
sonam kapoor and anand ahuja

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनम कपूरने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. संपूर्ण घर मुलाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. अभिनेत्री नीतू कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करून सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे अभिनंदन केले आहे.

नीतू कपूरने पोस्ट शेअर केली

चाहत्यांना आनंदाची बातमी देताना नीतू कपूरने शेअर केलेली पोस्ट. ही पोस्ट सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "२० ऑगस्ट, २०२२ रोजी आम्ही एका सुंदर मुलाचे स्वागत केले आहे. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल डॉक्टर, मित्र, परिचारिका आणि कुटुंबीयांचे खूप खूप आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आम्हाला माहित आहे की आमचे जीवन कायमचे बदलले आहे. सोनम आणि आनंद."

नीतू कपूरने शेअर केली आनंदाची बातमी

ही पोस्ट शेअर करत नीतू कपूरने अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांचे अभिनंदन केले आहे. दोघेही सोनम कपूरचे आई-वडील आहेत. अनिल कपूर देखील छोट्या पाहुण्याच्या आगमनाने खूप उत्साहित आहे. आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले आहे, "बेबी निरोगी आहे. सोनम आणि आनंदने तिचे स्वागत केले आहे. आमचे तिच्यावर फक्त आणि फक्त प्रेम आहे. नवीन पालकांचे खूप खूप अभिनंदन."

कपूर कुटुंबात जल्लोष

'कपूर खानदान'मध्ये ही वेळ फक्त सेलिब्रेशनसाठी आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना चाहतेही कमेंट करून शुभेच्छा देत आहेत. चाहते रेड हार्ट इमोजी पोस्ट करत आहे. अनिल कपूरशिवाय रिया कपूर, फराह खानसह अनेक सेलिब्रिटींनी ही पोस्ट शेअर केली आहे.

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news