डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी जिद्दीने पुढे जावे अशा शुभेच्छा अभिनेत्री जुई गडकरी हिने दिल्या. दरम्यान, तिने अभिनेत्री जुई गडकरी हिला झालेल्या आजाराशी ती कशी चार हात करत आहे, याची कहाणी तिने मांडली आहे. तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय.
RA (rheumatoid arthritis) हा आजार तिला झाला आहे. हा एक असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे! हा Auto immune disease आहे. तोHeridetary असतो. या आजारात तुमची ईम्युन सिस्टीमच तुमच्या चांगल्या पेशींवर ॲटॅक करत राहते. तुमचे सांधे जॅम होऊ लागतात तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो असे तिने सांगितले आहे. त्याच बरोबर तिने तिची नाजूक बाजूदेखील यात मांडली असून तिच्या गर्भाशयावर देखील याचा परिणाम झाला असल्याचं म्हटलंय.
या सगळ्यामुळे तिला आवडणाऱ्या ट्रेकिंग, जीमिंग, बॅडमिंटन , घरातली काम ही सगळी कामं चार वर्ष बंद होती. यामुळे तिला डिप्रेशनचा देखील सामना करावा लागला. इतकंच नव्हे तर ती तेव्हा 'पुढचं पाऊल' या मालिकेत काम करत होती. कालांतराने तिला ही मालिका तिच्या या आजारामुळे सोडावी लागली होती. आजदेखील सगळ्यातून मार्ग काढून आयुष्य आनंदाने जगत आहे. त्यामुळे सर्व महिलांनी आपापले मार्ग काढत जिद्दीने आणि आनंदाने जीवन जगा असा सल्ला देखील तिने आपल्या या पोस्टद्वारे दिला आहे.
याचसोबत तिने आहार आणि व्यायामाकडे लक्ष देऊन हे दुखणं कशाप्रकारे कमी केलं, हे देखील मांडलं आहे. तिने मोठी फेसबूक पोस्ट लिहिलीय. सोबतचं एक साडीतील फोटोदेखील शेअर केला आहे.