Jacqueline Fernandez : जॅकलिनचा संडे स्पेशल मेनू बिर्याणी की… (video)

Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez

पुढारी ऑनलाईन न्यूज : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनची दिल्लीत पटियाला हाऊस न्यायालयात चौकशी सुरू आहे. याच दरम्यान जॅकलिनने तिच्या कामातून वेळ काढून संडे स्पेशल बनवला आहे. मात्र, तिच्या जेवणातील मेनू तिने सांगितलेला नाही.

अभिनेत्री जॅकलिनने ( Jacqueline Fernandez ) नुकतेच संडे स्पेशल बनवत खास जेवणाचा बेत आखला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या व्हिडिओत जॅकलिन जेवणावर ताव मारताना दिसत आहे. तर तिच्या पुढ्यात केळाच्या पानांच्या पात्रात भात आणि बिर्याणी दिसतेय. यावेळी जॅकलिन डिनर टेबलवर असून तिने पांढऱ्या रंगाचा चुडीदार परिधान केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'Guess the dish ?? Happy Sunday!!'. असे लिहिले आहे. यात जॅकलिन खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. मात्र, या व्हिडिओच्या बॅकग्राउडंला आवाज नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी जॅकलिन तिचा संडे मेनू काय आहे, असे अनेक प्रश्न विचारले आहेत. तर एका नेटकऱ्याने बिर्याणी की अंडाकरी बेत, वरण भात, nelum kole bhat?असे त्याने म्हटलं आहे. या व्हिडिओला १ मिनिटांत ६० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

<strong style="color: #2b2b2b; font-size: 16px;">हेही वाचा : </strong>
हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news