पिंक बिकिनीत दिशा : चाहते म्हणाले, ‘किती जळवशील बिचाऱ्या टायगरला?”

पिंक बिकिनीत दिशा : चाहते म्हणाले, ‘किती जळवशील बिचाऱ्या टायगरला?”

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या पर्सनल लाईफच्या चर्चेसोबत तिच्या अभिनयाचीही जादू कायम आहे. दिवसेंदिवस दिशा फिगर फ्लॉन्ट करताना कोणतीही कसर सोडत नाही. मिरर सेल्फीनंतर सध्या दिशाच्या आणखी एका बिकीनीने सोशल मीडियाचं तापमान वाढविलं आहे.

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर पिंक आणि केसरी रंगाच्या दोन वेगवेगळ्या बिकीनीतील फोटो शेअर केले आहेत. परतु, पिंक रंगाच्या बिकीत दिशा स्वीमिंग टँकच्या पाण्यात उतरली आहे. यातील एका फोटोत दिशा खास करून स्विमिंग पूलात उतरली असून, तिने तिच्या केसांना हात लावल्याचे दिसतेय. दिशा कोणत्या तरी निसर्गरम्य ठिकाणी असून स्विमिंग करण्यास सज्ज झाल्याचे दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Random' असे लिहिलंय.

नेहमीप्रमाणे दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'किती जळवशील बिचाऱ्या टायगरला?', 'आपल्या फिटनेसचा फॅन आहे ?', 'आज ब्ल्यू हैं पानी-पानी', 'अतिशय सुंदर', 'सिझलिंग', 'Aag?', 'Hottie??❤️', 'Wow ?', 'Beauty with figure ?', 'Stunning ?', 'awsm❤️❤️', 'grogeous❤️', 'Nice pic ?', 'Sizzling ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्सन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत ७ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. परंतु, दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. याशिवाय दिशा सोशल मीडियादेखील सक्रिय असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news