नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
तमिळ अभिनेता सिद्धार्थ त्याच्या एका ट्विटमुळे वादात सापडला आहे. सोमवारी त्याने तीन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. या वादग्रस्त ट्विटमध्ये रंग दे बसंतीमध्ये काम केलेल्या कलाकाराने नेहवालवर दुहेरी अर्थ काढून अपमानास्पद टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहून सिद्धार्थच्या ट्विटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांचे वक्तव्य लाजिरवाणे असल्याचेही म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही महाराष्ट्र सरकारला सिद्धार्थविरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे.
नेमके काय आहे प्रकरण
सायना नेहवालने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवर ट्विट केले आणि लिहिले – जर स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल तर कोणतेही राष्ट्र स्वतःला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. यावर अभिनेता सिद्धार्थने लिहिले – जगाचा चॅम्पियन (आक्षेपार्ह शब्द)… देवाचे आभार मानतो की आमच्याकडे भारताचे बचावकर्ते आहेत. एवढेच नाही तर सिद्धार्थने ट्विटमध्ये अमेरिकन पॉप सिंगर रिहानाचा हॅशटॅगही वापरला आहे.
वाद वाढल्यानंतर सिद्धार्थने आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण दिले. या ट्विटला प्रत्युत्तर देताना त्यांनी लिहिले की, त्यांचे ट्विट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. कुणालाही दुखवण्याचा त्याचा हेतू नव्हता.
हेही वाचा