पुढारी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये, जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पथकाने सोमवारी देशातील प्रसिद्ध पान मसाला ब्रँड शिखर पान मसाला हाताळणारे अनिल अग्रवाल आणि पवन मित्तल यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीजीआय टीमने अनिल आणि पवन यांना घेतले आहे. आता या दोघांचीही चौकशी होणार आहे. डीजीजीआयच्या पथकाने परिवहन नगर कार्यालयावरही छापा टाकला आहे.
तत्पूर्वी, सीजीएसटी पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील पांडेपूर येथील गुटखा व्यावसायिक लक्ष्मीकांत पांडे उर्फ पम्मीच्या कारखान्यावरही छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, सीजीएसटी पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा पांडेपूर परिसरातील प्रेमचंद्र कॉलनीतील गुटखा व्यापारी लक्ष्मीकांत पांडे उर्फ पम्मीच्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी तेथील कागदपत्रे तपासली आणि त्यांनी संगणकाची हार्डडिस्कसह इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी सीजीएसटीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. माहितीनुसार लाखो रुपयांची प्रथमदर्शनी करचोरी उघडकीस आली आहे. उर्वरित गोष्टी तपासानंतर समजतील असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: