Ileana D’Cruz | अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आई होणार, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Ileana D’Cruz | अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आई होणार, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) हिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार आहे. याबाबत तिने इंस्ट्राग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एक फोटो लहान मुलाच्या टी शर्टचा आहे. तर दुसरा फोटो गळ्यातील पेंडंटचा आहे. त्यावर मम्मा असे लिहिले आहे. तिने पोस्ट कॅप्शनमध्ये 'Coming soon Can't wait to meet you my little darling' असे नमूद केले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पहिल्या फोटोत, 'बर्फी' फेम इलियानाने लहान मुलाच्या टी शर्टचा फोटो पोस्ट केला आहे ज्यावर "And so the adventure begins" असे लिहिले आहे. पण तिने तिच्या जोडीदाराचे नाव उघड केलेले नाही.

"Congrats darling!," अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. दुसऱ्या एकाने "Wow congratulations. All the best." असे म्हटले आहे. सुरुवातीपासूनच इलियाना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे काही बोललेली नाही. इलियाना याआधी कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल याला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. मालदीवमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफसोबत सुट्टीचा आनंद घेताना दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यांनी त्यांच्या रिलेशनशीपबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. इलियाना यापूर्वी फोटोग्राफर अँड्र्यू निबोनसोबत गेल्या काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.

दरम्यान, इलियाना (Ileana D'Cruz) शेवटची द बिग बुलमध्ये दिसली होती, ज्यात अभिषेक बच्चन तिचा सह-कलाकार होता. हा चित्रपट कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केला होता आणि अजय देवगणने त्याची निर्मिती केली होती. ती आता रणदीप हुड्डासोबत 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये दिसणार आहे. बर्फी, रुस्तम हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news