Abhijit khandkekar : माझ्या नवऱ्याची बायकोनंतर अभिजीत नव्या भूमिकेत

abhijit khandkekar
abhijit khandkekar

पुढारी ऑनलाईन डेस्क

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून गुरू म्हणजेच अभिजीत खांडकेकर या अभिनेत्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली होती. आता हा अभिनेता पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. एका नव्या संगीत मालिकेच्या माध्यमातून तो नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल.

अभिजीत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. पुढे माझी या प्रियाला प्रित कळेना, माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. त्याने अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सूत्रसंचालन केलं आहे. मी पण सचिन, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. त्याचसोबत सोपं नसतं काही ही त्याची मराठी वेबसीरीजही गाजली होती.

abhijit khandkekar
abhijit khandkekar

आता तो नवी मालिका तुझेच मी गीत गात आहेमध्ये दिसणार आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता खांडकेकर साकारणार आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे. कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फूर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अशा दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं.

पत्नीही आहे अभिनेत्री

अभिजीतची पत्नी सुखदादेखील अभिनय क्षेत्रात आहे. तिने बाजीराव या सुपरहिट हिंदी चित्रपटात बाजीरावची बहीण अनुबाईचं पात्र साकारलं होतं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news